Saturday, March 30, 2013

!!!!!.....That is a true Indian with ethics.....!!!!!

As told by someone from Tata Administrative Services : Few months after 26/11, Taj group of Hotels owned by TATAs launched their biggest tender ever for remodeling all their Hotels in India and abroad.
Some of the companies who applied for that tender were also Pakistanis. To make their bid stronger, two big industrialists from Pakistan visited Bombay House ( Head office of Tata ) in Mumbai without an appointment to meet up with Ratan Tata since he was not giving them any prior appointment.
They were made to sit at the reception of Bombay house and after a few hours a message was conveyed to them that Ratan Tata is busy and can not meet anyone without an appointment.
Frustrated, these two Paki industrialists went to Delhi and thru their High Commission met up with than Commerce Minister Anand Sharma . Sharma immediately called up Ratan Tata requesting him to meet up with the two Paki Industrialists and consider their tender "enthusiastically".
Ratan Tata replied..."you could be shameful, I am not" and kept the phone.
Few months later when Pakistani government placed an order of Tata Sumo's to be imported into Pakistan , Ratan Tata refused to ship a single vehicle to that country. This is the respect and love for motherland that Ratan Tata has.
Something that our current Politicians should learn from.

You got to stand for something in your life...else you will fall for everything..........
 

!!!!!.....$दोन मनांतील अंतर$.....!!!!!

एकदा एका साधुने त्याच्या शिष्यांना विचारले, " आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असेका?". सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दीले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचीत ओरडून बोलतो."
यावर साधुमहाराज म्हणाले, " पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरी सुध्दा आपण ओरडतो।जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो". यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याच उत्तराने साधुचे समाधान झाले नाही. शेवटी साधुमहाराजांनी स्वतःच उत्तर दीले. ते म्हणाले, " जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात."
"
आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतीशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?" असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले," कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते.
आणि जसजसे दोन व्यक्ती मधील प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतुनच किंवा देहबोलीतुनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.

शिकवण- परस्परांत वाद विवाद आणि भांडण तंटे होतच राहतात मात्र कीतीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढु देउ नका।तसे होउ दील्यास दोन व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होइल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही................

!!!!!.....कोटेबल कोट्‌स.....!!!!!

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
-
नारायण मूर्ती

यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
-
विश्वनाथन आनंद

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
-
धीरूभाई अंबानी

पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
-
जे. आर. डी. टाटा

फोटोग्राफरच्या एका "क्लिक'मुळे जगणे चिरकाल होते.
-
रघू राय

चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.
-
बिल गेट्

मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता.
-
कल्पना चावला

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.
-
बराक ओबामा

माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
-
आयझॅक न्यूटन

मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.
-
सर्वपल्ली राधाकृष्ण

!!!....आज....!!!

!!!....आज....!!!
आज देखणेपणावर जाऊ नका,सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.श्रीमंताला भुलू नका,'आलेल्या ' पैशाला 'जाण्याच्या' वाटा पटकन सापडतात .जी व्यक्ती तुमच्या चेहर्यावर हास्य फुलवू शकते,तीच तुमच्या आयुष्याला
अर्थ देऊ शकते.
***********************

प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं,तरी तुमच्या स्वप्नाचा ध्यास सोडू
नका.करावीशी वाटेल, ती प्रत्येक गोष्ट करून पाहा.जिथे जावंसं वाटेल ,तिथे
जा . आयुष्य एकदाच मिळतं .आणि संधीही पुन्हापुन्हा येत नसते.
*********************

आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून ,खोडून टाकत आहे, काल
आणि उद्या.
*********************

कालचा दिवस मला खूप काही शिकवून गेला हे खरं;पण मी आज जे करेन त्यावर माझा
उद्या आकाराला येईल, हे मला समजलं आहे.
*********************

आजचा दिवस मी उमेदीने, हिमतीने, जिद्दीने आणि मनापासून जगेन, कारण हा दिवस
माझ्या आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही, हे मला ठाऊक आहे.
*********************

आजचा दिवस ही माझ्या आयुष्याने मला दिलेली शेवटची संधी असू शकेल. उद्याचा
सुर्योदय मी पाहीनच याची काय खात्री ?
*********************

आज मी हरणार नाही. मागे पाहाणार नाही, अश्रु ढाळणार नाही,एकही संधी हातची
जाऊ देणार नाही. आज मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात मौल्यवान संपत्तीची
उत्तम गुंतवणूक करीन :वेळ
*********************

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,निदान एक काम पुर्ण करीन, निदान एक अडथळा
ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन .
********************

आज मी चिडणार नाही, वैतागणार नाही, धुसफुसणार नाही. मनावरचं निराशेचं मळभ
हटवून आज मी प्रसन्न हसेन.
*********************

आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन. आणि आकाशात नजर लावून तिथे
चमकणारी माझ्या स्वप्नाची नक्षत्रं डोळे भरून पाहीन .
आज निदान एवढं तरी मी करीनच.!!!!!!!!