Saturday, March 30, 2013

!!!....आज....!!!

!!!....आज....!!!
आज देखणेपणावर जाऊ नका,सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.श्रीमंताला भुलू नका,'आलेल्या ' पैशाला 'जाण्याच्या' वाटा पटकन सापडतात .जी व्यक्ती तुमच्या चेहर्‍यावर हास्य फुलवू शकते,तीच तुमच्या आयुष्याला
अर्थ देऊ शकते.
***********************

प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं,तरी तुमच्या स्वप्नाचा ध्यास सोडू
नका.करावीशी वाटेल, ती प्रत्येक गोष्ट करून पाहा.जिथे जावंसं वाटेल ,तिथे
जा . आयुष्य एकदाच मिळतं .आणि संधीही पुन्हापुन्हा येत नसते.
*********************

आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून ,खोडून टाकत आहे, काल
आणि उद्या.
*********************

कालचा दिवस मला खूप काही शिकवून गेला हे खरं;पण मी आज जे करेन त्यावर माझा
उद्या आकाराला येईल, हे मला समजलं आहे.
*********************

आजचा दिवस मी उमेदीने, हिमतीने, जिद्दीने आणि मनापासून जगेन, कारण हा दिवस
माझ्या आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही, हे मला ठाऊक आहे.
*********************

आजचा दिवस ही माझ्या आयुष्याने मला दिलेली शेवटची संधी असू शकेल. उद्याचा
सुर्योदय मी पाहीनच याची काय खात्री ?
*********************

आज मी हरणार नाही. मागे पाहाणार नाही, अश्रु ढाळणार नाही,एकही संधी हातची
जाऊ देणार नाही. आज मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात मौल्यवान संपत्तीची
उत्तम गुंतवणूक करीन :वेळ
*********************

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,निदान एक काम पुर्ण करीन, निदान एक अडथळा
ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन .
********************

आज मी चिडणार नाही, वैतागणार नाही, धुसफुसणार नाही. मनावरचं निराशेचं मळभ
हटवून आज मी प्रसन्न हसेन.
*********************

आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन. आणि आकाशात नजर लावून तिथे
चमकणारी माझ्या स्वप्नाची नक्षत्रं डोळे भरून पाहीन .
आज निदान एवढं तरी मी करीनच.!!!!!!!!

Wednesday, December 26, 2012

मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना.....!!!!!

This Years First Post!!!!!!!!!!

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा
घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी
पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत
नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच
कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता
आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या
ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे
नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही...... त्या उडणार्‍या म्हातारीने
हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते.
आपण जमिनीवरच आहोत."
वपुंच्या वपूर्झा मधील ह्या ओळी वाचल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं...आणि सारं सारं
बालपण आठवलं.

लाटेने कि काळाने नेला तो किनार्‍यावरचा वाळूचा किल्ला?
भोवर्‍याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला...
हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही....
गेले कुठे ते चालताना "पॅकपॅक" आवाज करणारे पायातले बूट?
"मी नाही देणार जा माझं चॉकलेट" म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ....
किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत...
हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताई" दाखवत आईने भरवलेला...
घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला?
गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस....
गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?
धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?
झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
अ आ इ ई पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?
कशाला आलं हे आपल्याला शहाणपण????
हरवलं त्यात ते सुंदर बालपण.......

खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना? आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन
गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्‍यात अजुनही दाटलेल्या
असतात, त्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होते. आपलं मनही किती विचित्र
असतं ना. जेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटते. शाळा सोडुन बाबांसारखे ऑफिसला
जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतं. मुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक
करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतं. मात्र आता मोठे झाल्यावर पुन्हा ते
बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं.

पाखरे जर दिवस असते
आभाळी मी सोडिले नसते
फिरूनी त्यांना ह्रदयात मी
कोंडुन ठेविले असते
ते पाखरू मागे न वळले
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
जे परतुन कधी ना आले...

चांदोबा चांदोबा कुठे रे गेलास
दिसता दिसता गडप झालास
हाकेला ओ माझ्या देशील का
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का...?

आयुष्यातील हे सोनेरी दिवस कसे पटकन निघुन गेले नाही. अगदी चांदोबा मामाच्या या
गाण्यासारखेच ते दिवस बघता बघता सरून गेले. उरल्या त्या फक्त आठवणी.
पण.... मला पुन्हा ते दिवस जगायचे आहे. एक घास चिऊचा...एक घास काऊचा करत भरवलेला
जेवणाचा घास आईच्या हातातुन खायचा आहे, मला पुन्हा शाळेत जायचंय, मित्रांबरोबर खोड्या
करायच्यात, मधल्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवणाचा डब्बा शेअर करायचाय, शाळेच्या स्नेहसंमेलनात
भाग घ्यायचा आहे. पत्र्याची शिट्टी इतरांचा ओरडा पडेपर्यंत वाजवायची आहे. बायोस्कोपमधुन
दिसणारी रंगबेरंगी दुनिया बघायचीय, चार आण्यात मिळणार्‍या लिमलेटच्या गोळ्या, शेंगदाण्याची
चिक्की, चन्यामन्या बोरं खायची आहे, वडाच्या पारंब्यावर मनसोक्त झोके घ्यायचे आहेत, "घोटीव"
पेपराच्या होड्या, विमाने बनवायची आहेत, तासन् तास रंगणारा नवा व्यापार खेळायचा आहे,
चंपक, ठकठक्, चांदोबा पुस्तकांचा एका दिवसात वाचुन फडशा पाडायचा आहे. कम्प्युटर से भी तेज
दिमाग असणारा चाचा चौधरी, सोबत साबूला घेउन वाचायच आहे, मॅन्ड्रेक्सच्या हातातील अंगठीचा
शिक्का उठवायचा आहे. फास्टर फेणे आणि चिंगीच्या साहसी करामती पुन्हा अनुभवायच्या आहेत.
साबणाच्या पाण्याचे फुगे उडवायचे आहेत. वाळुत किल्ले बनवायचे आहेत. खुप काही करायचे आहे
कारण...
उडणार्‍या त्या म्हातारीने माझे वय जरी नेले असले तरी माझे मन, जुन्या आठवणी मात्र अजुनही
त्या म्हातारीला नेता आल्या नाही.

Monday, March 22, 2010

$$ मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो $$

मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो
माझ्यावरहि कुणाचं नियंत्रण असायचं
नकळत का होईना मी हि हरवून जायचो
कधी कधी तर वेळेचाहि भान विसरून जायचो

दिवसभराच्या कामात एकदा तरी फोने करायचो
नाहीच Phone तर Miss Call तरी द्यायचो
रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ
पण मी मात्र SMS -SMS खेळत राहायचो

Weekends ला कधी MALL मध्ये जायचो
खूप Try केल्यावर तिचा हाथ पकडायचो
ओठातून काही शब्दच निघेनात
फक्त चेहर्याकडे बघून Blush करायचो

सगळंच आता भूतकाळात विरून गेलं
माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं
जाता जाता मला खूप वेदना दिल्या
पण माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं
जाता जाता खूप काही शिकवून गेलं

किती तरी नाती आपण गृहीत धरतो
त्यांचं अस्तित्वच आपण Assume करतो
समजत नाही कधी मोल नात्यांचं
आणि मग दुख करतो ते दुरावल्याचं

आज खरंच समाधान वाटतंय
कि मी हि कधी प्रेम केलं होतं
खरंच माझं प्रेम व्यर्थ न्हवतं .......................
जाता जाता मला जगण्याच्या जवळ घेऊन गेलं.

## आयुष्याला दिशा देण्यासाठी ##

लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुष्कळ आहे
ते दिशाहीन होण्यासाठी

किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्यासाठी

देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी

किती सराव करावा लागतो
विजयश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी

कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी

विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जिवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे
ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी ........

Wednesday, October 21, 2009

@@ Aalas @@

"आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा."

Thursday, October 15, 2009

कॉफीची चव.........

त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते. ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा!वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?""माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत!अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...!काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती."माझ्या प्राणप्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे. आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो....आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील?"

एनिमसजचा वीर -- देव-दानवदेव-दानव..........

जसं चांगल्या आणि वाईट रक्तासाठी
हृदयात दोन वेगळे भाग असतात
तसं चांगल्या आणि वाईट विचारांसाठी
मानात दोन वेगळे भाग असतात

एका भागात देव राहातो
दुसऱ्यात राहातो दानव
परिस्थितीत भांडतात दोघे
निर्णय घेण्यात अडकतो मानव

माणसं वाईट किंवा चांगली नसतात
जिवनं वाईट किंवा चांगली नसतात
देव-दानव प्रत्येकात घर करतात
माणसाला कर्म करायला भाग पाडतात

देवाचं ऐकावं की दानवाचं हे
माणसापुढे असतात विकल्प
प्रत्येकच स्वत:चा रस्ता काढतो
निर्णय घेतो, करतो संकल्प

एनिमसजाच्या वीराला
हे माहिती असतं
तो स्वत:तल्या देवाचं
ऐकत असतो
देव - दानव लढतात
दानवाकडे दुर्लक्ष करतो

तो एनिमसजचा वीर असतो
दुसऱ्यातल्या देवांशी बोलत असतो
दुसऱ्यातल्या दानवांना ऐकवत असतो ...........