Thursday, October 15, 2009

एनिमसजचा वीर -- देव-दानवदेव-दानव..........

जसं चांगल्या आणि वाईट रक्तासाठी
हृदयात दोन वेगळे भाग असतात
तसं चांगल्या आणि वाईट विचारांसाठी
मानात दोन वेगळे भाग असतात

एका भागात देव राहातो
दुसऱ्यात राहातो दानव
परिस्थितीत भांडतात दोघे
निर्णय घेण्यात अडकतो मानव

माणसं वाईट किंवा चांगली नसतात
जिवनं वाईट किंवा चांगली नसतात
देव-दानव प्रत्येकात घर करतात
माणसाला कर्म करायला भाग पाडतात

देवाचं ऐकावं की दानवाचं हे
माणसापुढे असतात विकल्प
प्रत्येकच स्वत:चा रस्ता काढतो
निर्णय घेतो, करतो संकल्प

एनिमसजाच्या वीराला
हे माहिती असतं
तो स्वत:तल्या देवाचं
ऐकत असतो
देव - दानव लढतात
दानवाकडे दुर्लक्ष करतो

तो एनिमसजचा वीर असतो
दुसऱ्यातल्या देवांशी बोलत असतो
दुसऱ्यातल्या दानवांना ऐकवत असतो ...........

No comments: