Friday, February 29, 2008

फक्त एकदा मागे बघ मी उभा आहे.

फक्त एकदा मागे बघ मी उभा आहे.
खोट खोट विसरशीलही मला तु पण जे दिवस आपले होते ते कसे वजा करशील आयुष्यातुन
नाही ग वेडे आपले हे प्रेम विसरण्यासाठी नव्हते तर ते दिर्घायुषी व अमर होते
चिवचिवणारया चिमण्या, किलबिलणारे पक्षीमोकळ्या आकाशातील चंद्र
चमचमणारा प्रकाश रातराणीचा सुगंध दिवस रातीचा अतुट बंध
रिमझिमणारा पाऊस फ़ुलांची फ़ुलण्यातली हौस
माझे प्रेम विसरू शकशील का?
मरशीलही कदाचित माझ्याशिवाय,
बोलली होतीस एकदा तु मला
माहीत आहे विसरण्याचा निष्फळ प्रयत्न करशील तु
आठवु लागलो कि कासाविस होशील तु
भुतकाळात डोकावुन शोधशील तु
नाहीच सापडलो तर विरघळशील तु
विरघळून मिठीत येण्यासाठी तडफडशील् तु
पण तुझी ति तडफड नाही ग पाहु शकणार मी
कारण रोज तोच अनुभव घेतोय मी तु
मला विसरुच शकणार नाहीस मग अशी दुर का?
चातकाचा शोध केंव्हातरी संपेल
कोलंबसचा प्रवास केंव्हाचा संपलाय
चुकलोही असेन अनाहुतपणे मुर्खासारखा वागलोही असेन
पण त्याची एवढी मोठी शिक्षा का देतेस मला आणी स्वतःलाही
शेजारचा गुलमोहोर फुलण्याआधीडोळ्यांतील्
अश्रु सुकण्याआधी
शरिरातुन प्राण जाण्याआधी
तु परत येशील का?
पुन्हा परतुन लांबवर येऊ नकोसफक्त एकदा मागे बघ..........

No comments: