Wednesday, October 21, 2009

@@ Aalas @@

"आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा."

Thursday, October 15, 2009

कॉफीची चव.........

त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते. ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा!वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?""माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत!अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...!काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती."माझ्या प्राणप्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे. आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो....आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील?"

एनिमसजचा वीर -- देव-दानवदेव-दानव..........

जसं चांगल्या आणि वाईट रक्तासाठी
हृदयात दोन वेगळे भाग असतात
तसं चांगल्या आणि वाईट विचारांसाठी
मानात दोन वेगळे भाग असतात

एका भागात देव राहातो
दुसऱ्यात राहातो दानव
परिस्थितीत भांडतात दोघे
निर्णय घेण्यात अडकतो मानव

माणसं वाईट किंवा चांगली नसतात
जिवनं वाईट किंवा चांगली नसतात
देव-दानव प्रत्येकात घर करतात
माणसाला कर्म करायला भाग पाडतात

देवाचं ऐकावं की दानवाचं हे
माणसापुढे असतात विकल्प
प्रत्येकच स्वत:चा रस्ता काढतो
निर्णय घेतो, करतो संकल्प

एनिमसजाच्या वीराला
हे माहिती असतं
तो स्वत:तल्या देवाचं
ऐकत असतो
देव - दानव लढतात
दानवाकडे दुर्लक्ष करतो

तो एनिमसजचा वीर असतो
दुसऱ्यातल्या देवांशी बोलत असतो
दुसऱ्यातल्या दानवांना ऐकवत असतो ...........

कोमलतेची ताकद.............

कोमलतेत ताकद असते.पावसाचं पाणी आकाशातून पडतं,माती वाहुन जाते, नध्यांना पूर येतात, भलेभले खडक झिजतात.पाणी वहातच रहातं. कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं.कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही, थांबत नाही. स्वतःची वाट शोधून बाजूने निघुन जातं. ह्या वहाण्यात सातत्य असल्यामुळेच खडक हळू हळू लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो.

मानवी मनाचा धर्म ...........

भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही !मानवाचे मन केवळ भुतकाळाच्या सखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्यागरूडपंखांच वरदानही लाभलेलं आहे.एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं , ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं , त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि सुदैवानं ते स्वप्न जरी भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांई दुसर्‍या स्वप्नामागनं धावणं , हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं !- वि.स. खांडेकर.

स्वतःवर विश्वास ठेवा.............

ज्यांचा स्वतः वर विश्वास असतो तेच अशक्य गोष्टीही करू शकतात. त्याचवेळी आत्मविश्वास गळपटलेली माणसं मात्र नशिबाला दोष आणि कारणांची जंत्री पुढे करण्याशिवाय काहीही करू शकत नाहीत.कसा येतो हा आत्मविश्वास?सराव हा आत्मविश्वासाचा पाया आहे. नवीन , आपल्याला माहीत नसलेली गोष्ट आपण केली तर आपण चुकू, त्यामुळे आपलं हसं होईल, आपण तोंडघशी पडू ही भितीच अनेकदा आपली पावलं खेचत असतात. आपल्याला नकारात्मकतेकडे घेऊन जात असतात. पण कोणतीही नवी गोष्ट तेव्हाच जूनी होते जेव्हा आपण त्याला भिडतो, वारंवार सामोरे जातो. त्या नावीन्याचं कोणतही अप्रुप मग राहत नाही.'मला जमणारच नाही 'म्हणून आपण त्यापासून लांब पळत गेलो तरी ती 'भिती ' मात्र आपल्यालात्यापासून दूर जाऊ देत नाही. त्यामुळेच ' प्रयत्न तर करू , नक्किच जमेल ' ही विचारधाराच आपल्यातली सकारात्मक ऊर्जा वाढवेल ...........

Sunday, October 11, 2009

$$$$$$$कधी पाहिले आहे तुम्ही???????






















"आई!!!!!!!!!!!!!!"


$$तुझी वाट मी अजून पाहतो कशाला$$

तुझी वाट मी अजून पाहतो कशाला......
तुझी वाट मी अजून , पाहतो कशाला
तुझ्या धुंदीत मी अजून , राहतो कशाला

पुन्हा पुन्हा ओठावरी, तुझे नाव आहे
पुन्हा पुन्हा काळजात, तुझा ठाव आहे
तुझ्या आठवात अजून, नाहतो कशाला
तुझी वाट मी अजून , पाहतो कशाला

वाळूतले ते तुझे, पावलाचे ठसे
अजून कसे माझ्या, डोळ्यामधे वसे
तेच तेच तुझे भास, साहतो कशाला
तुझी वाट मी अजून , पाहतो कशाला

तुझ्या डोळ्यात आता, मला जागा नाही
आणि ती नसल्याचा, मला त्रागा नाही
रोज अश्रुधारेत मी, वाहतो कशाला
तुझी वाट मी अजून , पाहतो कशाला

विसरलीस तू मला, मला खंत नाही
तुला विसरण्यास, मला उसंत नाही
पुन्हा पुन्हा तिच आग, दाहतो कशाला
तुझी वाट मी अजून , पाहतो कशाला...

Once again after long time...................

"Curiosity is the key to creativity."

"Failure is the simply the opportunity to being again, this time more intelligently."

"Best is not the end point, but a starting point for for innovation."

"Imagination is more important than knowledge"

"Intellectuals solve problems, geniuses prevent them."

"It is possible to fly without motors, but not without knowledge and skill."

"The three great essentials to achive any thing worth while are: Hard work, Stick-to-itivness, and common sense."

"It is lack of faith that maks people afraid of meeting challenges, and I belive in myself."

"Always turn a negative situation into a positive situation."

"There is no 'I' in 'TEAM' but there is 'I' in 'WIN'."

"Keep your face to sunshine and you can not see a shadow."

"Control your own destiny or somone else will."

"Knowlade has to be improved, challanged, and increased constantly, or it vanishes"

"The best way to predict the feature is to create it."

"In times of great stress or adversity, it's always best to keep busy, to plow your anger and your energy in to something positive."

"Apply yourself. Get all the education you can, but then, by god, do somthing. Don't just stand there, make it happen."

"Motivation is everything. You can do the work of two people, but you can not be two people. Insted, you have to inspire the next guy down the line and get him inspire his people."