तुझी वाट मी अजून पाहतो कशाला......
तुझी वाट मी अजून , पाहतो कशाला
तुझ्या धुंदीत मी अजून , राहतो कशाला
पुन्हा पुन्हा ओठावरी, तुझे नाव आहे
पुन्हा पुन्हा काळजात, तुझा ठाव आहे
तुझ्या आठवात अजून, नाहतो कशाला
तुझी वाट मी अजून , पाहतो कशाला
वाळूतले ते तुझे, पावलाचे ठसे
अजून कसे माझ्या, डोळ्यामधे वसे
तेच तेच तुझे भास, साहतो कशाला
तुझी वाट मी अजून , पाहतो कशाला
तुझ्या डोळ्यात आता, मला जागा नाही
आणि ती नसल्याचा, मला त्रागा नाही
रोज अश्रुधारेत मी, वाहतो कशाला
तुझी वाट मी अजून , पाहतो कशाला
विसरलीस तू मला, मला खंत नाही
तुला विसरण्यास, मला उसंत नाही
पुन्हा पुन्हा तिच आग, दाहतो कशाला
तुझी वाट मी अजून , पाहतो कशाला...
No comments:
Post a Comment